महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झेंनडाँगला टे.टे.चे सुवर्ण

06:47 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात चीनचा चौथा मानांकित टेबल टेनिसपटू फेन झेंनडाँगने सुवर्णपदक पटकाविले. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वीडनच्या मोरगॅरेधचा पराभव केला. पुरूष एकेरीच्या अंमित फेरीतील सामन्यात झेंनडांग मोरगॅरेधचा 7-11, 7-9, 11-9, 11-8, 11-8 अशा पाच गेम्स्मधील लढतीत पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. चार वर्षांपूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष एकेरीत त्याने रौप्य पदक पटकाविले होते. तर पुरूषांच्या सांघिक प्रकारात झेंनडाँगने सुवर्ण पदक मिळविले होते. चीनचा चौथा मानांकित टेबल टेनिसपटू    झेंनडाँगने आतापर्यंत विश्व टेबिल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत 8 सुवर्ण पदके मिळविली आहेत. तसेच त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 5 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी एकूण 8 पदकांची कमाई केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष एकेरीच्या कास्य पदकासाठीच्या सामन्यात फ्रान्सच्या फेलिक्सने ब्राझीलच्या कॅलेडिरेनोचा 11-6, 12-10, 11-7, 11-6 अशा 4 गेम्समध्ये एकतर्फी पराभव केला. टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात भारताच्या मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांनी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. आता सांघिक टेबल टेनिस या प्रकारात भारतीय महिला संघाचा राऊंड 16 मधील सामना रुमानियाबरोबर तर भारतीय पुरूष संघाचा सामना चीनबरोबर मंगळवारी होत आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article