‘ऐतराज 2’ चित्रपटात तापसी पन्नू
प्रियांका चोप्राच्या जागी निवड
चित्रपट निर्माते सुभाष घई स्वत:चा सुपरहिट चित्रपट ‘ऐतराज’चा सीक्वेल घेऊन येणार आहेत. ‘ऐतराज’ या चित्रपटातील प्रियांका चोप्राच्या व्यक्तिरेखेला लोकांकडून मोठी पसंती मिळाली होते. चित्रपटातील तिची भूमिका खलनायिकेची असली तरीही तिचा बोल्डनेस आणि बिनधास्त शैली चाहत्यांना आवडली होती. आता ‘ऐतराज 2’ या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राऐवजी तापसी पन्नूची निवड करण्यात आल्याचे समजते. तापसीला या चित्रपटाच्या सीक्वेलची पटकथा देण्यात आली आहे. या चित्रपटात तापसीचा दमदार अभिनय पाहणे प्रेक्षकांसाठी चांगला अनुभव ठरणार आहे. सुभाष घई यांनी नोव्हेंबर महिन्यात या सीक्वेलची घोषणा केली होती. प्रियांकासोबत ऐतराज या चित्रपटात अक्षय कुमार आणि करिना कपूरने काम केले होते. तर सीक्वेलमध्ये तापसीसोबत अन्य कलाकार कोण असणार हे निर्मात्यांनी अद्याप ठरविलेले नाही. तापसी यापूर्वी ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मैसी आणि सनी कौशल हे कलाकार दिसून आले होते. तापसी पुढील काळात ‘गांधारी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचे दिग्दर्शन देवाशीष मखीजा करतील.