For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गांधारी’मध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गांधारी’मध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत
Advertisement

तापसी पन्नू स्वत:चा चित्रपट ‘गांधारी’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो अत्यंत भावुक करणारा आहे. या चित्रपटात तापसी एका आईच्या भूमिकेत आहे, जी स्वत:च्या बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत आहे. परंतु हे काम ती डोळ्यांवर पट्टी बांधून करत असते. ट्रेलरची सुरुवात तापसी आणि एका छोट्या मुलीसोबत होते, तापसी यात डोळ्यांवर पट्टी बांधून लपाछपीचा खेळ खेळत असतात. पार्श्वभूमीवर एक अत्यंत भावुक कविता ऐकू येते. दुसऱ्या दृश्यात मुलगी मिष्टीसोबत तपासी रेल्वेप्रवास करत असते आणि याचदरम्यान तिच्या मुलीचे अपहरण होते.  खूप शोध घेऊनही मुलीचा शोध लागत नाही. परंतु हार न मानणाऱ्या महिलेची भूमिका साकारणारी तापसी यावेळी डोळ्यांवर पट्टी बांधून मुलीला शोधण्याच्या मिशनवर निघते. तापसीवर हल्ला होतो आणि तिची दृष्टी जाते, परंतु ती खास प्रशिक्षण मिळविते आणि मुलीच्या शोधासाठी बाहेर पडत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात छाया कदमही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तापसीला प्रशिक्षण देणाऱ्या महिलेची भूमिका त्यांनी साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशीष मखीजा यांनी केले आहे. चित्रपटात श्वक सिंह आणि स्वस्तिका मुखर्जी देखील दिसून येणार आहे. हा चित्रपट 3 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.