For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अस्सी’ चित्रपटात तापसी

06:30 AM Feb 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘अस्सी’ चित्रपटात तापसी
Advertisement

चित्रपटाचा ट्रेलर सादर, कनी कुसरुतिची होतेय चर्चा

Advertisement

तापसी पन्नूचा नवा चित्रपट ‘अस्सी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटात तापसीने एका वकिलाची भूमिका साकारली असून ती एका बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतेय. अस्सी चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले आहे. अनुभव आणि तापसीने यापूर्वी मुल्क आणि थप्पड या चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते. तापसीचा हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

बलात्कार पीडितेने गुन्हेगारांचे चेहरे पाहिले नसतात आणि ती त्यांना ओळखू शकत नसते, मग तिच्यावरच प्रश्न उपस्थित केले जातात असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. ‘गुन्हा घडला त्यादिवशी देशभरात बलात्काराच्या 80 तक्रारी नोंद झाल्या, ज्यातील 76 प्रकरणांमध्ये सुनावणीही सुरू झाली नाही’ या आशयाचा संवाद तापसीच्या तोंडी आहे.  मग ट्रेलरमध्ये एका युवतीचे अपहरण करत कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो आणि मग तिला रेल्वेमार्गानजीक रक्तबंबाळ अवस्थेत फेकले जात असल्याचे दृश्य आहे.

Advertisement

या चित्रपटात तापसीसोबत रेवती, कनी कुसरुति, मनोज पाहवा, मोहम्मद जीशान अय्यूब, नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक आणि सीमा पहवा तसेच कुमुद मिश्रा हे कलाकार आहेत. कनी कुसरुति सुमारे दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिने अनेक मल्याळी चित्रपटामंध्ये काम केले आहे. कनीला 2009 साली ‘केरळ कॅफे’ या मल्याळी चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली होती.

Advertisement
Tags :

.