For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

T+0 सेटलमेंट योजनेला बाजारात सुरुवात

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
t 0 सेटलमेंट योजनेला बाजारात सुरुवात
Advertisement

ज्या दिवशी समभाग विकाल, त्याच दिवशी जमा होणार पैसे : 25 समभागांचा समावेश : सेबीकडून योजनेला प्रारंभ

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने 28 मार्चपासून स्टॉक मार्केटमध्ये पर्यायी आधारावर T+0 सेटलमेंट लागू केले आहे. यापूर्वी काल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने 25 समभागांची यादी प्रसिद्ध केली आहे ज्यात गुरुवारपासून एकाच दिवशी सेटलमेंट लागू केले जात आहे. दोन्ही स्टॉक एक्स्चेंजने 25 स्टॉक्ससह  T+0  सेटलमेंट सिस्टमची चाचणी सुरू केली आहे. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही हे शेअर्स विकले, त्याच दिवशी संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. याआधी शेअर बाजारात T+1 सेटलमेंट प्रणाली लागू होती. म्हणजे शेअर्स विकल्यानंतर एक दिवसानंतर पैसे जमा होत होते. तीन महिन्यांपूर्वी, बाजार नियामकाने T+0 साठी सल्लापत्रे जारी केली होती आणि त्यावर 12 जानेवारीपर्यंत लोकांची मते मागवली होते.

Advertisement

T+0 सेटलमेंटचा गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल?

T+0 सेटलमेंट सिस्टमद्वारे, शेअर्स विकल्याच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, जे ते इतर कोणत्याही कारणासाठी वापरू शकतात. शेअर्स खरेदी केल्यावर, शेअर्स त्याच दिवशी डिमॅट खात्यात जमा केले जातील, जेणेकरून तुमची इच्छा असल्यास, तुम्ही त्याच दिवशी शेअर्स गहाण ठेवू शकता. आता शेअर्स दुसऱ्या दिवशी डिमॅट खात्यात जमा होतात.

 प्रणालीमुळे बाजारात तरलता वाढेल

नव्या सेटलमेंट प्रणालीच्या येण्यामुळे बाजारात तरलता वाढेल, ज्यामुळे गुंतवणूकदार प्रतीक्षा कालावधीची वाट न पाहता इतर समभाग खरेदी करू शकतील. तसेच, गुंतवणूकदारांकडे कमी कालावधीसाठी पैसे असले तरी ते बाजारात पैसे कमवू शकतील. ऑक्टोबर 2024 पर्यंत त्वरित सेटलमेंट सुरू होईल. यापूर्वी, सेबी प्रमुख माधुरी पुरी बुच यांनी आम्ही पुढील वर्षी मार्चपर्यंत व्यवहार वेळ 1 तास कमी करण्याची आणि ऑक्टोबर 2024 पर्यंत तत्काळ प्रणाली लागू करण्याची तयारी करत असल्याचेही म्हटले होते.

2002 पूर्वी T+5 सेटलमेंट सिस्टम

2002 पूर्वी आपल्या देशात T+5  सेटलमेंट प्रणाली होती. सेबीने 2002 मध्ये T+3 सेटलमेंट लागू केले. T+0 सेटलमेंट दोन टप्प्यात लागू केले जाणार सेबीने म्हटले आहे की सर्व गुंतवणूकदार T+0 सेटलमेंट सिस्टमसाठी पात्र आहेत. सेबीने T+0 सेटलमेंट दोन टप्प्यात लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता.

टप्पे

  • पहिला टप्पा: जर तुम्ही ट्रेडिंगच्या दिवशी दुपारी 1:30 पर्यंत शेअर्स विकले तर ते 4:30 वाजेपर्यंत तुमचे व्यवहार पूर्ण केले जातील.
  • दुसरा टप्पा: दुपारी 3:30 पर्यंत केलेले सर्व व्यवहार त्वरित निकाली काढले जातील. तो सुरू झाल्यानंतर पहिला टप्पा बंद केला जाईल.
Advertisement
Tags :

.