काळ्यादिनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे
म. ए. समिती पुणे विभागाचे आयोजन
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्यावतीने 1 नोव्हेंबर या काळ्यादिनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे. गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित आहे. 1956 साली तत्कालीन केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बहुभाषिक मराठी प्रांत म्हैसूर राज्यात डांबला आणि 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती झाली.
गेल्या 70 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असताना कर्नाटक सरकार ऐनकेन प्रकारे सीमाभागातील मराठी भाषिकांवर दडपशाही करून त्यांना त्यांचे संविधानीक हक्क डावलत आहे. या सर्व गोष्टींचा निषेध व महाराष्ट्र सरकारला जागृत करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. यासाठी पुणे विभागातील समस्त मराठी भाषिकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, वैराळ सुळकर, सातेरी पाटील, गंगाराम वीर यांनी केले आहे.