सिडनी स्वीनीला 530 कोटीची ऑफर
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्वीनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. एका चित्रपटासाठी ला 530 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. भारतातील एक प्रॉडक्शन कंपनी सिडनी स्वीनीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा वापर करू इच्छित आहे. यामचुळे तिला एका चित्रपटासाठी 45 दशलक्ष पाउंड म्हणजेच 530 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. यात 415 कोटी रुपये मानधन म्हणून तर 115 कोटी रुपयांचा स्पॉन्सरशिप करार सामील आहे. परंतु सिडनीने ही ऑफर स्वीकारली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महाग चित्रपट असेल. सिडनी एका अमेरिकन अभिनेत्रीची भूमिका साकारणार असून जी एका भारतीय सेलिब्रिटीच्या प्रेमात पडते. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार असून ते लंडन, दुबई, न्यूयॉर्क आणि पॅरिसमध्ये पार पडणार आहे. सिडनी ही अमेरिकन अभिनेत्री असून ती सध्या 28 वर्षांची आहे. तिला एव्हरीथिंग सक्स!, द हँडमेड्स टेल, शार्प ऑब्जेक्ट्स या चित्रपटांसाठी ओळखले जाते. युफोरिया ड्रामा सीरिजमध्ये तिला ओळख मिळाली. 2019 मध्ये ती वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूडमध्ये दिसून आली होती. 2024 मध्ये सुपरहीरो चित्रपट मॅडम वेब’मधून ती झळकली होती.