For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वित्झर्लंडचा बोस्निया-हर्झेगोविनावर दणदणीत विजय

06:50 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वित्झर्लंडचा बोस्निया हर्झेगोविनावर दणदणीत विजय
Advertisement

वृत्तसंस्था,/ कॅलिफोर्निया

Advertisement

फिफा विश्वचषकातील गट ब मधील सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जोहान मन्झांबी व रुबेन वर्गास यांनी निर्णायक कामगिरी करीत बोस्निया व हर्झेगोविना संघावर स्वित्झर्लंडने 4-1 असा दणदणीत विजय मिळविला. अखेरच्या टप्प्यात बोस्निया संघाला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले.

प्रारंभी प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदणे स्वित्झर्लंडसाठी कठीण गेले. पंरतु बदली खेळाडूंच्या आगमनानंतर सामन्याचे चित्र बदलले. बोस्नियाच्या तारिक मुहरमोविचला मिळालेल्या रेड कार्डला मन्झांबीनेच महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या सत्रात स्विसने काही संधी निर्माण केल्या होत्या. डॅन एनडोये व रेमो फ्रुलर गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बोस्निया हर्झेगोविनाचा गोलरक्षक वासिलजने अनेकदा अप्रतिम बचाव केले. त्याने एनडोयेचा ओव्हरहेड फटका व ब्रिल एम्बोलोने मारलेला तिरकस हेडर अचूक थोपवला. मात्र हायड्रेशन ब्रेकनंतर स्विसने दबाव वाढवला तर दुसरीकडे अमर डेडिकने स्विसचा गोलरक्षक ग्रेगोर कोबेलचीही परीक्षा पाहिली.

Advertisement

मैदानात उतरल्यावर काही वेळातच मन्झांबीने कोंडी फोडली. 74 व्या मिनिटाला वर्गासने मारलेल्या क्रॉसमुळे पेनल्टी बॉक्समध्ये गोंधळ निर्माण झाला आणि मन्झांबीने रिबाऊंडवर व्हॉली मारत गोल केला. त्यानंतर त्याने दिलेल्या एका महत्त्वाच्या पासमुळे एम्बोलोला मुहरमोविचने खाली पाडले. त्यामुळे त्या बचावपटूला थेट रेड कार्ड मिळाले. वर्गासने नंतर अचूक फटका मारत स्विसची आघाडी 3-0 अशी केली आणि 90 व्या मिनिटाला मन्झांबीने आपला दुसरा गोल करीत संघाची आघाडी आणखी वाढवली. बोस्नियाने एर्मिन महमिकच्या माध्यमातून थोडा प्रतिकार केला आणि सामन्याच्या अखेरीस एक गोल नेंदवला. पण स्विसने जिब्रिल सोविरुद्ध झालेल्या फाऊलनंतर ग्रॅनिट झाकाने पेनल्टीवर गोल नोंदवला. गट ब मध्ये स्विस संघ आता अग्रस्थानावर पोहोचला आहे.

रविवारचे सामने

1) जर्मनी वि. आयव्हरी कोस्ट

वेळ : शनिवारी मध्यरात्री 1.30 वा.

2) इक्वेडोर वि. कुरासावो

वेळ : पहाटे 5.30 वा.

3) जपान वि. ट्युनिशिया

वेळ : सकाळी 9.30 वा.

4) स्पेन वि. सौदी अरेबिया

वेळ : रात्री 9.30 पासून.

Advertisement
Tags :

.