For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविणार स्वीत्झर्लंड

06:08 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविणार स्वीत्झर्लंड
Advertisement

जग आता वीज उत्पादनासाठी हरित ऊर्जेच्या दिशेने सरक आहे. विशेषकरून सोलर पॅनेलच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रयत्न गतिमान झाला आहे. आतापर्यंत सोलर प्रकल्प  सथापन करण्यासाठी रिकामी जमीन, छत आणि शेतांचा वापर केला जात होता, परंतु आता एका देशाने रेल्वेमार्गावरच सोलर पॅनेल बसविण्याची तयारी सुरू केली आहे.

Advertisement

जगात पहिल्यांदाच अशाप्रकारचे काम स्वीत्झर्लंड करणार आहे. स्वीत्झर्लंडने रेल्वेच्या मार्गांवर गालिच्याप्रमाणे सोलर पॅनेल्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीस स्टार्टअप सन-वेजला न्यूचॅटेलच्या पश्चिम कँटेनमध्ये तीन वर्षांच्या प्रायोगिक प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याचे काम 2025 मध्ये सुरू होणार आहे.

रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविण्याच्या योजनेमुळे स्वीत्झर्लंडची ऊर्जा आवश्यकता पूर्ण करण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकासातही योगदान मिळणार आहे. केवळ रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविल्याने हजारो मेगावॅट वीज निर्माण होऊ शकते, याचबरोबर रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविल्याने भूमी वापर कमी करता येणार असल्याचा अनुमान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

प्रवासभाड्यात घट शक्य

याचबरोबर रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविल्याने वाहतूक क्षेत्राच्या ऊर्जा क्षमतेत सुधारणा होईल. यामुळे रेल्वेसाठी सौरऊर्जा निर्माण होईल आणि रेल्वेंचा संचालन खर्चही कमी करता येणार आहे. अशास्थितीत प्रवासभाड्यात घट करता येणार आहे, यामुळे अधिक लोक रेल्वेप्रवासाला प्राथमिकता देऊ शकतील.

भारतात काय घडतयं?

स्वीत्झर्लंड एकीकडे रेल्वेमार्गावर सोलर पॅनेल बसविण्याची योजना आखत आहे. तर भारतात रेल्वेच्या डब्यावर सोलर पॅनेल बसविण्याचा विचार सुरू आहे. उत्तर रेल्वेकडून याचे परीक्षणही करण्यात आले आहे. डब्यातील पंखे, बल्ब याकरता वीजेची व्यवस्था सोलर पॅनेलद्वारे व्हावी अशी रेल्वेची इच्छा आहे.

Advertisement
Tags :

.