For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेल्जियमला हरवून स्वीस अंतिम फेरीत

06:45 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेल्जियमला हरवून स्वीस अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / सिडनी

Advertisement

येथे सुरू असलेल्या युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत स्वीसने बेल्जियमचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. स्वीसच्या विजयामध्ये बेलींडा बेन्सीकची कामगिरी महत्त्वाची ठरली. तिने मिश्र दुहेरीच्या सामन्यामध्ये जेकुब पॉल समवेत बेल्जियमच्या जोडीचा पराभव केला.

मिश्र दुहेरीच्या सामन्यात बेन्सीक आणि पॉल या जोडीने बेल्जियमच्या इलेसी मर्टन्स आणि बर्जस यांचा 6-3, 0-6, 10-5 असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या लढतीत स्वीसच्या बेन्सीकने महिला एकेरीचा सामना जिंकताना बेल्जियच्या मर्टन्सचा 6-3, 4-6, 7-6 (7-5) असा पराभव केला. या विजयामुळे स्वीसने बेल्जियमवर 1-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर पुरूष एकेरीच्या सामन्यात बेल्जियमच्या बर्जसने स्वीसच्या वावरिंकाचा 6-3, 6-7 (4-7), 6-3 असा पराभव केला. यावेळी दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर मिश्रदुहेरीचा सामना निर्णायक ठरला. स्वीसने बेल्जियचा 2-1 असा पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Advertisement

कोको गॉफ विजयी

या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील महिला एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने पोलंडच्या द्वितीय मानांकीत इगा स्वायटेकचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केल्याने अमेरिकेने या लढतीत पोलंडशी 1-1 अशी बरोबरी साधली. तत्पूर्वी पुरूष एकेरीच्या सामन्यात पोलंडच्या हुरकेजने अमेरिकेच्या टेलर फ्रित्झचा 7-6 (7-1), 7-6 (7-2) असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. आता या उपांत्य लढतीत मिश्र दुहेरीचा सामना निर्णायक ठरेल.

Advertisement
Tags :

.