For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्जेरियाला 2-0 ने हरवून स्वित्झर्लंड पुढील फेरीत

06:34 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्जेरियाला 2 0 ने हरवून स्वित्झर्लंड  पुढील फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, व्हँकुव्हर, ब्रिटिश कोलंबिया : स्वित्झर्लंडने अखेर विश्वचषकाच्या बाद फेरीत विजयाची नोंद केली असून ब्रिल एम्बोलो आणि डॅन एनडोये यांनी गोल केल्याने त्यांना अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून 16 संघांच्या फेरीमध्ये प्रवेश करता आला. स्वित्झर्लंडचा पुढील सामना कोलंबिया आणि घाना यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी होईल. हा सामना पुढील मंगळवारी व्हँकुव्हर येथे होणार आहे.

Advertisement

सामन्याच्या सुऊवातीच्या 10 मिनिटांत अल्जेरियाचे वर्चस्व होते, पण त्यानंतर जोहान मंझांबी उजव्या बाजूने वेगाने पुढे गेला आणि त्याने एम्बोलोला अगदी जवळून गोल करण्यासाठी चेंडू पास केला. एम्बोलोने ही कामगिरी यशस्वी करत आपला 26 वा आंतरराष्ट्रीय गोल साजरा केला. योग्य वेळी गोल करणे महत्त्वाचे होते, असे स्विस प्रशिक्षक मुरात याकिन म्हणाले. तो एक नशिबाने मिळालेला गोल होता, पण त्यानंतर मैदानावर आमचे वर्चस्व राहिले असे मला वाटते. एकूण कामगिरीबद्दल मी खूप आनंदित आहे, कारण आम्ही अत्यंत कुशल खेळाडू असलेल्या संघाविऊद्ध खेळलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीलाच एका मिनिटाच्या आत एनडोयेने ‘बॉक्स’च्या वरच्या भागातून जोरदार फटका मारत गोल केला. अल्जेरियाचा गोलरक्षक लुका झिदानला झेप घेऊनही हा चेंडू अडवता आला नाही. 81 व्या मिनिटाला फॅबियन रिडरने स्वित्झर्लंडसाठी तिसरा गोल करण्याच्या जवळ मजल मारली होती, परंतु ‘टॅप-इन’ करताना तो चुकला आणि चेंडू अल्जेरियाच्या गोलपोस्टच्या समोरून निघून गेला. 2014 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकात परतलेल्या अल्जेरियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. 2014 मध्येही त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला होता, परंतु अंतिम विजेत्या जर्मनीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Advertisement

1938 नंतर प्रथमच स्वित्झर्लंड बाद फेरीत विजयी

1938 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेनंतर स्वित्झर्लंडला बाद फेरीतील सामना जिंकता आला नव्हता. मात्र 1954 मध्ये संघाने प्ले-ऑफ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. जरी स्वित्झर्लंडने मागील तीन विश्वचषकांमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेली असली, तरी त्या स्पर्धांमध्ये 32 संघांचाच सहभाग होता आणि त्यांना त्यापुढील फेरीत जाता आले नव्हते.

Advertisement
Tags :

.