स्वायटेक, साबालेंका शेवटच्या आठ खेळाडूत
वृत्तसंस्था/ माद्रिद
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक तसेच बेलारुसची द्वितीय मानांकित साबालेंका यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या तिसरी फेरीतील सामन्यात टॉप सिडेड स्वायटेकने सोळाव्या मानांकित अॅलेक्सेंड्रोव्हाचा 6-4, 6-7 (3-7), 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अन्य एका सामन्यात 27 व्या मानांकित मार्टिकने क्रेसिकोव्हाचा 6-3, 7-6 (7-1) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या तृतीय मानांकित पेगुलाने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवताना ट्रिव्हेसनवर 6-3, 2-6, 6-3 अशी मात केली. बेलारुसच्या द्वितीय मानांकित साबालेंकाने 16 वर्षीय अँड्रिव्हाचा 6-3, 6-1 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत प्रवेश केला. इजिप्तच्या मेयर शेरीफने मर्टन्सचा 6-4, 0-6, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.