राज्यात स्वाईन फ्लू ची साथ वाढली
स्वाईन फ्लूमध्ये कोल्हापूर चौथ्या स्थानावर
कोल्हापूर
राज्यात स्वाईन फ्लू च्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरला आहे. कोल्हापूरात २६३ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या स्वाईन फ्लूमध्ये कोल्हापूर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईत सर्वाधिक ७७९ रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणे तर तिसऱ्या क्रमांकावर नाशिक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ही माहिती आहे. याच अहवालानुसार या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२४ ते २६ नोव्हेंबर पर्यंत राज्यात २ हजार ३३५ इतके स्वाईन फ्लूचे रुग्णचे आढळले आहेत.
राज्य शासनातर्फे गर्भवती महिला, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि स्वाईन फ्लू यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींना लसीकरण सुरू केला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ४५ हजारांहुन अधिक लसींचे वाटप करण्यात आले आहे. तर त्यापैकी २ हजार ६०८ जणांचे लसीकरणही करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. बबिता कमलापूरकर, निगराणी अधिकारी, राज्य आरोग्यसेवा संचालनालय विभाग यांनी दिली.