महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय स्पर्धेत हिंद क्लबच्या जलतरणपटूंची बाजी

10:14 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : नुकत्याच दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात घेण्यात आलेल्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना बेंगळूर रीजनला जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिली. कुमार चिन्मय बागेवाडी केंद्रीय विद्यालय दोन याने 19 वर्षाखालील मुलांच्या गटात 50 मीटर फ्रीस्टाइल व 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 2 सुवर्ण 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य  पदक संपादन केले. कुमार आदी शिरसाठ केंद्रीय विद्यालय तीन याने 17 वर्षाखालील गटात 400 मी. आयएममध्ये रौप्य तर 200 मी.  ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कांस्यपदक संपादन केले. कुमार वैजनाथ सोनपणावर केवी 2 च्या विद्यार्थ्याने 4×100 मीटर मिडले रिले व 4×100 मी. फ्रीस्टाइल रिलेमध्ये एक सुवर्ण व एक रौप्य पदक संपादन केले.

Advertisement

कुमार अर्णव कुलकर्णी केंद्रीय विद्यालय दोन याने 17 वर्षाखालील गटात डायव्हिंगमध्ये 1 मी. स्प्रिंग बोर्डमध्ये सुवर्ण व 3 मी. स्प्रिंग बोर्डमध्ये रौप्य पदक संपादन केले.कुमार मयुरेश जाधव व कुमारी प्राची कदम केंद्रीय विद्यालय दोन यांनी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन चांगली कामगिरी केली. वरील जलतरणपटू कुमार चिन्मय बागेवाडी,कुमार आदी शिरसाठ व कुमार अर्णव कुलकर्णी यांची नोव्हेंबर महिन्यात राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्कूल गेम्स एसजीएफआयसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.वरील सर्व जलतरणपटूंना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव,शिवराज मोहिते व रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तर आबा क्लबचे चेअरमन मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लागते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article