स्विगीचा आयपीओ 6 नोव्हेंबरला होणार खुला
मुंबई :
ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्विगी यांचा आयपीओ (प्र्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव) 6 नोव्हेंबर रोजी सबस्क्रीप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओकरिता गुंतवणूकदारांना 8 नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे.
आयपीओच्या इश्यू प्राईसची किंमत 371-390 प्रति समभाग अशी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. स्विगीचे समभाग भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एमएसईवर 13 नोव्हेंबर रोजी सूचिबद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरा मोठा आयपीओ
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया यांच्यानंतर स्विगीचा दाखल होणारा आयपीओ हा सर्वात मोठा दुसरा आयपीओ राहणार आहे. ह्युंडाई मोटर इंडियाचा आयपीओ 3.3 अब्ज डॉलर्सचा होता. या महिन्याच्या सुरुवातीला ह्युंडाईचा आयपीओ बाजारात आला होता.
कधी झाली स्थापना
2014 साली स्विगीची स्थापना झाली असून भारतातील 2 लाखपेक्षा अधिक हॉटेल, रेस्टराँ यांच्यासोबत त्यांच्या खाद्यपदार्थांची ग्राहकांना डिलीव्हरी देण्याची सेवा करते आहे. फूड डिलीव्हरी क्षेत्रात झोमॅटो, बिग बास्केट अशा कंपन्याही कार्यरत आहेत.