स्विगी 10 हजार कोटी उभारणार
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लिमिटेड पुढील आठवड्यात 10,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांना समभाग विकून ही रक्कम उभारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने शेअर विक्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी सिटीग्रुप, जेपी मॉर्गन चेस आणि कोटक महिंद्रा कॅपिटलची निवड केली आहे.
7 नोव्हेंबर रोजी, बोर्डाने क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे निधी उभारण्याची योजना मंजूर केली होती. तथापि, ही योजना अद्याप शेअरहोल्डर्स आणि नियामक मान्यता मिळवू शकलेली नाही. कंपनीने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.
स्विगीचा निव्वळ तोटा 74 टक्केने वाढला
जुलै-सप्टेंबर तिमाहीत स्विगीचा निव्वळ तोटा वर्षाच्या आधारावर 74 टक्क्यांनी वाढून 1,092 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 626 कोटींचा तोटा झाला होता.
समभागाची कामगिरी
स्विगीचे शेअर्स मंगळवारी 3.15 टक्क्यांनी वाढून 400 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या सहा महिन्यांत त्यात 20.28 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात 18 टक्क्यांची घट झाली आहे.