For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्विगी’ची आता आयआरसीटीसीसोबत भागीदारी

06:35 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्विगी’ची आता आयआरसीटीसीसोबत भागीदारी
Advertisement

स्विगीची सेवा 152 रेल्वे स्थानकांवर होणार उपलब्ध : होळीच्या काळात प्रवास वाढण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरण करणारा प्लॅटफॉर्म स्विगी आता आपली रेल्वे स्थानकांवरील सेवा वाढविण्याच्या तयारीत आहे. यासाठी स्विगीने आयआरसीटीसी सोबत भागीदारीचा आणखी विस्तार करण्याची घोषणा केली. कंपनीने त्यांच्या फूड ऑन ट्रेन सेवेचा वेगाने विस्तार केला आहे, ज्यामुळे एकाच वर्षात 117 टक्के नेटवर्क विस्तार झाला आहे.

Advertisement

स्विगीच्या मते, त्यांची पुरवठा साखळी आता देशाच्या विविध भागात विस्तारली आहे. ही पुरवठा साखळी पूर्वेकडील गुवाहाटीपासून पश्चिमेकडील राजकोट आणि उत्तरेकडील पठाणकोटपासून दक्षिणेकडील तिरुनेलवेलीपर्यंत पसरलेली आहे. या विस्तारामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ सहज मिळू शकतील.

स्विगीचे फूड स्ट्रॅटेजी अँड कस्टमर एक्सपिरीयन्सचे उपाध्यक्ष दीपक मालू म्हणाले की, खाद्यपदार्थ हे ट्रेन प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि कंपनी प्रवाशांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यांनी सांगितले की, होळीच्या काळात प्रवास वाढण्याची अपेक्षा आहे, म्हणून कंपनीने प्रमुख जंक्शन तसेच इटारसी, तिरुनेलवेली आणि खरगपूर सारख्या प्रादेशिक स्थानकांवर सेवा मजबूत केल्या आहेत.

स्विगीने प्रवाशांच्या ऑर्डर डेटा आणि मागणी ट्रेंडच्या आधारे विकसित केलेल्या ट्रेन-फ्रेंडली डिश मेनूचा विस्तार देखील केला आहे. यात अंदाजे 40 लोकप्रिय ट्रेन डिश समाविष्ट आहेत. या विभागाचे आता एकूण ट्रेन ऑर्डरमध्ये 22 टक्के योगदान राहिले असून ते आणखीन वाढणार असल्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.