महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्विगी आयपीओ सादरीकरणाच्या तयारीत

06:02 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 हजार कोटी उभारण्याचा अंदाज : सेबीकडे  करु शकते अर्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

बेंगळूरची फूड अॅग्रीगेटर कंपनी स्विगी लवकरच आपला आयपीओ सादर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांची उभारणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता लवकरच बाजारातील नियामक सेबीकडे केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण मात्र दिलेले नाही. मागच्या 23 एप्रिलच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये निधी उभारण्यासाठी समभागधारकांनी मंजुरी दिली होती. आयपीओअंतर्गत स्विगी ही कंपनी 3750 कोटी रुपयांचे ताजे समभाग जारी करू शकते तर दुसरीकडे ऑफर फॉर सेल अंतर्गत 6664 कोटी रुपयांची उभारणी करण्याची योजना दृष्टीपथात आहे.  आयपीओ सादरीकरणासंदर्भातली कागदपत्रे या आठवड्यातच सादर केली जातील असेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.

2022 येणार होता आयपीओ

खरंतर स्विगी ही कंपनी 2022 मध्येच शेअर बाजारात उतरण्यासाठी इच्छुक होती. त्यावेळी कंपनीने 10.7 अब्ज डॉलर्सच्या मूल्यासोबत 700 कोटी रुपयांचा निधी उभारला होता मात्र कंपनीने निधीची कमतरता आणि अधिक मूल्याच्या संदर्भातील गुंतवणूकदारांच्या चिंतेनंतर आयपीओ आणण्यासंदर्भातला आपला निर्णय लांबणीवर टाकला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article