For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेक, डिमीट्रोव्ह, व्हेरेव, अॅनिसिमोव्हा तिसऱ्या फेरीत

06:36 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेक  डिमीट्रोव्ह  व्हेरेव  अॅनिसिमोव्हा तिसऱ्या फेरीत
Advertisement

प्लिस्कोव्हा, सोफिया केनिन, मेनसिक, रॉयर यांचे आव्हान संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

AAAAAAAAAAAAAAAAAAAAAर महिलांच्या विभागात पोलंडची विद्यमान विजेती इगा स्वायटेक, अमेरिकेची अमंदा अॅनिसिमोव्हा यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. झेकची प्लिस्कोव्हा, अमेरिकेची केनिन तसेच मेनसिक, अमेरिकेचा किप्सन यांचे आव्हान संपुष्टात आले.

Advertisement

पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात जर्मनीच्या व्हेरेवने बिगर मानांकीत व्हॅलेन्टीन रॉयरचा 6-1, 6-3, 7-6 (7-3) असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. आा तिसऱ्या फेरीत व्हेरेवची लढत अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनशी होणार आहे. फ्रान्सच्या गिरॉनने आपल्याच देशाच्या हॅलेसचा पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे.

पुरूषांच्या विभागातील दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात बल्गेरियाच्या डिमीट्रोव्हने झेकच्या याकुब मेन्सीकचा 7-6 (7-5), 4-6, 7-5, 6-3 अशा चार सेट्समध्ये पराभव केला. डिमीट्रोव्हचा तिसऱ्या फेरीतील सामना इटलीच्या बेरेटेनीबरोबर होणार आहे. अमेरिकेच्या टेलर फ्रित्झने पुरूष एकेरीची तिसरी फेरी गाठताना दुसऱ्या फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या पॅट्रीक किप्सनचा 6-2, 6-2, 7-5 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरिनोचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.

महिलांच्या विभागातील दुसऱ्या फेरीतील सामन्यात पोलंडची विद्यमान विजेती इगा स्वायटेकने माजी टॉपसिडेड झेकच्या 34 वर्षीय प्लिस्कोव्हाचा 6-1, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. या सामन्यात स्वायटेकने पहिला सेट केवळ 25 मिनिटांत जिंकला. 2025 च्या टेनिस हंगामाला प्लिस्कोव्हाला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. स्वायटेकचा तिसऱ्या फेरीतील सामना फिलिपिन्सच्या अॅलेक्झांड्रा इलाशी होणार आहे. इलाने दुसऱ्या फेरीतील सामन्यात माया जॉईंटचा 3-6. 6-2. 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या अमंदा अॅनिसिमोव्हाने आपल्याच देशाच्या सोफीया केनीनचा 6-2, 4-6, 7-6 (10-3) असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. अॅनिसिमोव्हाचा तिसऱ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या मॅडिसन किजबरोबर होणार आहे.

Advertisement
Tags :

.