महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजपासून रताळी विक्री सौदे प्रारंभ

11:07 AM Sep 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
Malkapur Agricultural Produce Market Committee
Advertisement

शाहूवाडी प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर उपबाजार मलकापूर या ठिकाणी रताळी विक्री सौदे सुरू होणार आहेत. याचा शुभारंभ सोमवार 30 सप्टेंबर रोजी बाजार समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे या शुभारंभ सोहळ्यासाठी  व्यापारी, अडते व  शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने  रताळी विक्री साठी घेऊन   उपस्थित राहावे असे आवाहन सभापती प्रकाश देसाई व सचिव जयवंत पाटील यांनी केले आहे .

Advertisement

शाहुवाडी तालुक्यात रताळे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे सध्या रताळी काढणी हंगाम सुरू झाला आहे .  रताळी  पुणे ,मुंबई, वाशी या ठिकाणी जात आहेत  स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार मलकापूर येथे सोमवार 30 सप्टेंबर रोजी विक्री सौदा शुभारंभ होणार आहे याबाबत मलकापूर येथे   सभापती यांचे उपस्थितीत शाहूवाडी तालुक्यातील रताळी व्यापारी व शेतकरी यांची मीटिंग घेण्यात आली .

Advertisement

या  पुढे खरेदी  विक्री व्यवसायासाठी  सभापती श्री.प्रकाश देसाई, संचालक श्री.राजाराम चव्हाण व सचिव जयवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित शेतकरी व व्यापारी श्री.दादा यादव ,संदीप पाटील,सुभाष कोळेकर ,संतोष सनगर , मोहन कोरे,बंधू भिंगार्डे, संतोष तांदळे, राजाराम वाघ व विभागप्रमुख श्री.धोंडीराम ठोंबरे,संग्राम किटे उपस्थित होते.

या अनुषंगाने सोमवार 30 सप्टेंबर रोजी उपबाजार मलकापूर येथे रताळी विक्री  शुभारंभ होणार आहे . यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या ठिकाणी रताळी विक्रीसाठी घेऊन यावे असे आवाहन सभापती प्रकाश देसाई व सचिव जयवंत पाटील यांनी केले आहे

Advertisement
Tags :
Malkapur Agricultural Produce Market CommitteeSweet potato sale deal started
Next Article