मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजपासून रताळी विक्री सौदे प्रारंभ
शाहूवाडी प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर उपबाजार मलकापूर या ठिकाणी रताळी विक्री सौदे सुरू होणार आहेत. याचा शुभारंभ सोमवार 30 सप्टेंबर रोजी बाजार समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे या शुभारंभ सोहळ्यासाठी व्यापारी, अडते व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने रताळी विक्री साठी घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन सभापती प्रकाश देसाई व सचिव जयवंत पाटील यांनी केले आहे .
शाहुवाडी तालुक्यात रताळे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे सध्या रताळी काढणी हंगाम सुरू झाला आहे . रताळी पुणे ,मुंबई, वाशी या ठिकाणी जात आहेत स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार मलकापूर येथे सोमवार 30 सप्टेंबर रोजी विक्री सौदा शुभारंभ होणार आहे याबाबत मलकापूर येथे सभापती यांचे उपस्थितीत शाहूवाडी तालुक्यातील रताळी व्यापारी व शेतकरी यांची मीटिंग घेण्यात आली .
या पुढे खरेदी विक्री व्यवसायासाठी सभापती श्री.प्रकाश देसाई, संचालक श्री.राजाराम चव्हाण व सचिव जयवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित शेतकरी व व्यापारी श्री.दादा यादव ,संदीप पाटील,सुभाष कोळेकर ,संतोष सनगर , मोहन कोरे,बंधू भिंगार्डे, संतोष तांदळे, राजाराम वाघ व विभागप्रमुख श्री.धोंडीराम ठोंबरे,संग्राम किटे उपस्थित होते.
या अनुषंगाने सोमवार 30 सप्टेंबर रोजी उपबाजार मलकापूर येथे रताळी विक्री शुभारंभ होणार आहे . यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या ठिकाणी रताळी विक्रीसाठी घेऊन यावे असे आवाहन सभापती प्रकाश देसाई व सचिव जयवंत पाटील यांनी केले आहे