महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्विडनच्या डुप्लान्टिसचे दुसरे ऑलिम्पिक सुवर्ण

06:50 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्विडनचा पोल व्हॉल्टर आर्मंड डुप्लान्टिसने पुरूषांच्या पोल व्हॉल्टर प्रकारात सुवर्ण पदक पटकविले. डुप्लान्टिसने या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालताना ऑलिम्पिक आणि नवा विश्वविक्रम नोंदविला. ऑलिम्पिक स्पर्धेतील त्याचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे.

Advertisement

पुरूषांच्या पोल व्हॉल्टर या क्रीडा प्रकारात डुप्लान्टिस आणि अमेरिकेचा सॅम केन्ड्रीक्स यांच्यातच खरी चुरस पहावयास मिळाली. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राझीलच्या थियागोने नोंदविलेला या क्रीडा प्रकारातील 6.03 मीटरचा विक्रम डुप्लान्टिसने मोडीत काढला. या क्रीडा प्रकारात त्याने 6.25 मी.चे अंतर नोंदविले. यापूर्वी डुप्लान्टिसने या क्रीडा प्रकारात 6.24 मीटरचा विश्वविक्रम केला होता. हा विश्वविक्रम डुप्लान्टिसने मागे टाकला. वयाच्या 24 व्या वर्षी डुप्लान्टिसने नवव्यांदा विश्वविक्रम मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. या क्रीडा प्रकारात गेल्या तीन विश्वअॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत तसेच पॅरिस आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत डुप्लान्टिसने सुवर्णपदके मिळविली आहेत. या क्रीडा प्रकारात केन्ड्रीक्सने 5.95 मीटरचे अंतर नोंदवित रौप्य पदक तर ग्रीसच्या कॅरालिसने कास्य पदक मिळविले.

 

 

Advertisement
Next Article