For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये उद्या शपथविधी सोहळा

06:45 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये उद्या शपथविधी सोहळा
Advertisement

दोन उपमुख्यमंत्र्यांसह 13 सदस्यांचे मंत्रिमंडळ शक्मय : कार्यक्रमाला मोदी-शाह हजेरी लावणार

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाची  सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि अन्य 10 मंत्री शपथ घेऊ शकतात. नव्या सरकारच्या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. रायपूरच्या सायन्स कॉलेजच्या मैदानावर बुधवार, 13 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

विष्णूदेव साय हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. छत्तीसगडची कमान आदिवासी नेत्याकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीनंतर साय यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. आपल्या निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना साय यांनी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील असेही स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ सहकारी रमणसिंह यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाणार असल्याचेही सांगितले होते.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने 90 पैकी 54 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 68 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या जागा 35 पर्यंत कमी झाल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी) एक जागा जिंकण्यात यशस्वी झाली

Advertisement
Tags :

.