For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संमिश्र वातावरणात नवनिर्वाचितांचा शपथविधी

06:55 AM Dec 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
संमिश्र वातावरणात नवनिर्वाचितांचा शपथविधी
Advertisement

विधानसभेत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हुरहूर, आनंद, बहिष्कार आणि चिंता

Advertisement

मुंबई :  महाराष्ट्र राज्याच्या पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक झाल्यानंतर शनिवारी जुन्या आमदारांसह निवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी अनेकांच्या कधी एकदा शपथ घ्यायला मिळते यासाठी हुरहूर लागली होती, काहीना पुन्हा पुन्हा शपथ घेण्याची संधी मिळते याचा आनंद वाटत होता, काहांना शपथ घेताना मंत्रीपदाची संधी मिळेल की नाही याची चिंता होती, तर काहींनी शपथविधी सोहळ्यातही ईव्हीएमबाबत नाराजी व्यक्त करत शपथविधी सोहळ्यावर दिवसापुरता बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन दिवस चालणाऱ्या शपथविधी सोहळ्यातील  विधानसभागफहातील पहिल्या दिवसाचे वातावरण संमिश्र होते. दरम्यान दिवसभरातील शपथविधी कार्यक्रमात 184 जणांनी शपथ घेतली आहे. राहिलेले आमदार आज शपथ घेणार आहेत.

शिवरायांचा जयघोष आणि अभिवादन

Advertisement

शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे आमदार विधानभवनात आधीच उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आमदार फेटे बांधून अजित पवार यांच्या नेतफत्वाखाली दाखल झाले. मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्षा करीत होते. शिवसेनेचे आमदार भगवे फेटे बांधून एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी विधानभवनाच्या द्वारावर उभे होते. एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीन नेत्यांसह महायुतीच्या आमदारांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली. त्यानंतर शिवरायांच्या जयघोषात सर्वांनी विधान सभागफहात प्रवेश केला.

मुख्यमंत्र्यांआधी यांना दिली शपथ

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभागफहात शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला. अध्यक्षांनी काही नियम समजावून सांगितल्यानंतर प्रत्यक्ष शपथविधीला सुऊवात झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अगोदर चैनसुख संचेती, जयकुमार रावल, अॅड माणिकराव कोकाटे, अॅड आशीष जैस्वाल यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथ देण्यात आली.

ठाकरे गटाच्या आमदारांना नमस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ते विरोधीपक्षाच्या बाजूकडून आपल्या आसनाकडे येत असतानाच ठाकरे गटाचे विधिमंडळाचे गटनेते आदित्य ठाकरे यांना नमस्कार केला. मात्र आदित्य ठाकरे हस्तांदोलनासाठी पुढे होत असतानाच त्याचवेळी मुख्यमंत्री पुढे सरकले. त्यानंतर शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधीपक्षाच्या बाजूकडून त्यांच्या आसनाकडे येत असताना, गेली अडीच वर्षे त्यांना गद्दार म्हणून संबोधणाऱ्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे आणि शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही.

नीतेश राणेंची संस्कृतमध्ये शपथ तर निलेश राणेंचे जय नारायण

भाजपचे माजी पेंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आमदार झाले. दोन्ही बंधूंनी विधानभवनात यावेळी शपथ घेतली. नितेश राणे यांनी संस्कृतमधून तर निलेश राणे यांनी मराठी शपथ घेतली. परंतु, निलेश राणे यांनी शपथ पूर्ण केल्यानंतर जय शिवराय, जय नारायण असा उल्लेख केला.

राहुल नार्वेकरांच्या गळ्यात पुन्हा विधानसभा अध्यक्षाची माळ

विधानसभेच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी महायुतीच्या आमदारांना विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी 9 डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारी 12च्या सुमारास नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करू शकतात.  विशेष म्हणजे,  यंदा महायुतीकडे संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची अगदी सहजासहजी निवड होणार आहे. तर विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने विरोधक कोण उमेदवार देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.