For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या सरन्यायाधीशांचा उद्या शपथविधी

06:35 AM Nov 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
नव्या सरन्यायाधीशांचा उद्या शपथविधी
Advertisement

सात देशांचे सरन्यायाधीश उपस्थित राहणार : न्यायमूर्ती सूर्यकांत 53 वे सरन्यायाधीश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे रविवार, 23 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेतील. पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ सुमारे 14 महिन्यांचा राहणार आहे.

Advertisement

राष्ट्रपती भवनात सोमवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ब्राझीलसह भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका अशा सात देशांचे मुख्य न्यायाधीश त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित राहतील. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला इतर देशांचे इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी निमंत्रणे तयार करण्यात आली आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे संपूर्ण कुटुंब हिसारमधील पेटवाड गावात राहते. त्यांचे मोठे भाऊ मास्टर ऋषिकांत हे त्यांच्या कुटुंबासह गावात राहतात, तर एक भाऊ हिसार शहरात राहतो आणि तिसरा भाऊ दिल्लीत राहतो. सूर्यकांत यांच्या ऋषिकांत, शिवकांत आणि देवकांत या अन्य तीन बंधूंनाही समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पत्नी सविता सूर्यकांत या महाविद्यालयीन प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्यासह मुग्धा आणि कनुप्रिया या त्यांच्या दोन कन्याही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.

Advertisement
Tags :

.