For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ
Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

Advertisement

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्ष पराभूत झाला आहे. निवडणुकीनंतर मजूर पक्ष सत्तेवर आला आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या 29 सदस्यांचा विजय झाला आहे. यातील एक खासदार शिवानी राजा यांचा व्हिडिओ भारतात व्हायरल होत आहे. भारतीय वंशाच्या हुजूर पक्षाच्या सदस्य शिवानी या लिसेस्टर ईस्ट मतदारसंघाच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांना पराभूत केले आहे. विजयानंतर संसद सदस्य म्हणून त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे.

शिवानी यांनी शपथग्रहणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लिसेस्टर ईस्टचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत शपथ घेणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. भगवद्गीतेवर हात ठेवून राजे चार्ल्स यांच्याबद्दलच्या स्वत:च्या निष्ठेची शपथ घेताना खरोखरच गर्व वाटला असे त्यांनी नमूद केले आहे. शिवानी यांच्या विजयाकडे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे, कारण लिसेस्टर ईस्ट हा मतदारसंघ मजूर पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. 37 वर्षांपासून या मतदारसंघात मजूर पक्षाचा खासदार होता. यंदा मजूर पक्षाच्या बाजूने लाट होती तरीही शिवानी यांनी येथे विजय मिळवून सर्वांना चकित केले आहे.

Advertisement

शिवानी राजा यांचा जन्म 1994 मध्ये झाला होता. त्यांचे आईवडिल 1970 च्या दशकात केनिया आणि भारतातून लिसेस्टर येथे पोहोचले होते. त्यांचे वडिल गुजराती होते आणि ते केनियात राहत होते. तर त्यांची आई राजकोट येथून लिसेस्टर येथे स्थलांतरित झाली होती.  शिवानी यांनी फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक सायन्समध्ये पदवी मिळविली आहे. तसेच  अनेक प्रमुख कॉस्मेटिक ब्रँड्ससाठी त्यांनी काम केले आहे. शिवानी या परिवाराच्या व्यवसायातही सक्रीय आहेत.

Advertisement
Tags :

.