महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्वायटेक, अल्कारेझ, केर्बर,जोकोविच यांची विजयी सलामी

06:11 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या मोहिमेला पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक, स्पेनचा कार्लोस अल्कारेझ व सर्बियाचा जोकोविच यांनी शानदार विजयाने प्रारंभ केला.

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमधील टेनिस या क्रीडा प्रकाराला प्रारंभ झाला असून पुरुष एकेरीमध्ये स्पेनच्या अल्कारेझने लेबेनॉनच्या हेडी हबीबचा 6-3, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत इटलीच्या सिनेरने तंदुरुस्तीच्या समस्येवरुन माघार घेतल्याने जोकोविचला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले. जोकोविचने पहिल्या फेरीतील सामन्यात केवळ तासभराच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या एब्डनचा 6-0, 6-1 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. डेन्मार्कच्या रुनेने दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. पुरुषा एकेरीतील पहिल्या फेरीत झालेल्या सामन्यात रशियाचा डॅनिल मेदवेदेव्ह आणि अमेरिकेचा टेलर फ्रिझ यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले.

पुरुष दुहेरीत स्पेनच्या राफेल नादाल आणि कार्लोस अल्कारेझ यांनी विजयी सलामी देताना अर्जेंटिनाच्या गोंझालेज व मोल्टेनी यांचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला. स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदाल एकेरीमध्येही आपला सहभाग दर्शविला असून त्याचा पहिल्या फेरीतील सामना रविवारी उशिरा होत आहे.

महिलांच्या विभागातील पहिल्या फेरीच्या सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने रुमानियाच्या बेगुचा 6-2, 7-5 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या केर्बरने जपानच्या नाओमी ओसाकाचा 7-5, 6-3 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. इटलीच्या जस्मिन पाओलिनीने रोमानियाच्या बोगडेनचा 7-5, 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. गेल्या जूनमध्ये झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत स्वायटेकने जेतेपद तर पाओलिनीने उपविजेतेपद मिळविले होते. रोमानियाच्या अॅडीना क्रिस्टेनने कॅरोलिनी गार्सियाचा 5-7, 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेची कोको गॉफ आणि पेगुला यांनी महिला दुहेरीत विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या सॅव्हेली आणि पेरेझ यांचा 6-3, 6-1 असा पराभव केला. गॉफचे ऑलिम्पिक स्पर्धेतील हे पदार्पण आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article