For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवाहबंधनात अडकली स्वाती

06:57 AM Jul 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
विवाहबंधनात अडकली स्वाती
Advertisement

दिग्दर्शक श्रीकांत नागोथीसोबत विवाहबद्ध

Advertisement

अभिनेत्री स्वातीने दिग्दर्शक श्रीकांत नागोथीसोबत संसार थाटला आहे. स्वाती आणि श्रीकांत यांनी एका खासगी सोहण्dयात पारंपरिक रिती-रिवाजांसह विवाह केला आहे. स्वातीने याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दाली आहे. श्ऱीकांत नागोथीने ‘मंथ ऑफ मधु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात स्वाती मुख्य नायिका होती.

स्वातीने इन्स्टाग्राम अकौंटवर विवाहाची छायाचित्रे शेअर केली आहेत. परंतु या छायाचित्रांमध्ये दोघांचा चेहरा दिसून येत नाही. स्वातीचा हा दुसरा विवाह आहे. 2018 साली स्वातीने वैमानिक असलेल्या विकास वासूसोबत विवाह केला होता. या विवाहानंतर स्वातीने मनोरंजन क्षेत्राला रामराम ठोकला होता. ती दीर्घकाळ विदेशात राहिली होती. परंतु 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

Advertisement

घटस्फोटानंतर स्वातीने अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन केले होते. आता तिने श्रीकांतसोबत विवाह करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. स्वातीने ‘सुब्रमण्यपुरम, अष्ट चम्मा, स्वामी रा रा यासारख्या तमिळ आणि तेलगू चित्रपटांमधील दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Advertisement
Tags :

.