For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळात 1 मार्चला स्वस्तिक श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

03:23 PM Feb 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळात 1 मार्चला स्वस्तिक श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा
Advertisement

कुडाळ -

Advertisement

स्वस्तिक प्रतिष्ठान ( कुडाळ) या सामाजिक संस्थेच्यावतीने 1 मार्च रोजी 6 वाजता कुडाळ येथील एस.एन. देसाई चौक ( संत राऊळ महाराज महाविद्यालय नजीक ) येथे स्वस्तिक श्री 2026 जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने होणार आहे. स्वस्तिक प्रतिष्ठान ही संस्था मागील सात वर्षे आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणाऱ्या मित्र परिवाराला जोडण्याचे काम संस्थापक धीरज परब यांनी केले आहे. यातून अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या राबवित आहे. ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा.यासाठी या संस्थेच्या आठव्या वर्षी माध्यमातून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविजेता स्वस्तिक श्री. 30 हजार रू.व चषक आणि किताब,बेस्ट पोझर व मोस्ट इमप्रोव्हेड यांना प्रत्येकी 5 हजार रू.स्पर्धा पाच गटांमध्ये होणार असून 0 ते 55 किलो , 55 ते 60 किलो,60 ते 65 किलो, 65 ते 70 किलो तसेच 70किलो स्पर्धा पाच गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांक 3,555 रू , द्वितीय 3,1 11 रु., तृतीय 2,555 रु . चौथा 2,111 रु.,पाचवा 1,555 रु., सहावा 1,111 रु. तसेच प्रत्येकी चषक,
मेन्स फिजिक्स स्पर्धेसाठी प्रथम 5 हजार रू.,व्दितीय 4 हजार रू .,तृतीय 3 हजार रू., चौथा 2 हजार रू , पाचवा 1 हजार रू.तसेच प्रत्येकी चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे प्रेक्षकांनीही या स्पर्धेचा लाभ घ्यावा,असे आवाहन स्वस्तिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.