गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वरूप कदम तर उपाध्यक्षपदी सुनिल शेळके
गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सन २०२४-२५ सालासाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून नवीन प्लास्टिकचे चेअरमन स्वरूप कदम, उपाध्यक्ष पदी कोल्हापूर ऑटो चे चेअरमन सुनिल शेळके, मानद सचिव संजय ऊर्फ जितेंद्र देशिंगे व खजिनदार. अमोल यादव यांच्या नावांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी राजीव परीख होते.
माजी अध्यक्ष . नितीनचंद्र दळवाई यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा सांगताना औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्ता, औद्योगिक वसाहतीशी संलग्न ग्रामपंचायतींना कचरा उठाव करणेसाठी केलेला प्रयत्न, वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणेसाठी केलेले प्रयत्न, औद्योगिक वसाहतीमधील असे अनेक प्रश्न व सुविधा आमच्या कार्यकारिणीच्या काळात झाले असल्याचे सांगितले व संचालक मंडळाचे आभार मानले .
नूतन अध्यक्ष यांनी संस्थेच्या वतीने उद्योजकांच्या अडचणी सोडवणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेचे काम केले जाईल तसेच इतर उद्योग उपयोगी कामे करणार असल्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी सदर मिटींगला सचिन शिरगांवकर, दिपक चोरगे,नचिकेत कुंभोजकर, राजवर्धन जगदाळे, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, रणजीत मोरे, रणजीत पाटील, रामचंद्र लोहार, व्ही.आर.जगताप उपस्थित होते.