स्वारगेट बसस्थानक येथे घडलेल्या घटनेतील संशयित आरोपी हा सऱ्हाईत गुन्हेगार
आरोपी गाडे हा शिरुरला गेल्याची माहिती
पुणे
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या घटनेतील संशयित आरोपी हा सऱ्हाईत गुन्हागार असल्याचेही समोर आले आहे. या संशयित आरोपीवर याआधीही अनेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच हा आरोपी राजकिय पक्षाशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातल्या गुणाट या गावचा आहे. गुन्ह्यानंतर तो शिरुरला गेल्याची माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय गाडे हा पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतुक करायचा. तेव्हा तो वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवत असे. निर्जन स्थळी त्या महिलांची लुबाडणूक करायचा. एक महिलेच्या सतर्कतेमुळे मात्र दत्ता गाडे याला पोलिसांनी पकडले होतं. शिक्रापूर आणि शिरूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्ता गाडे याचे घर शिरुर तालुक्यातील गुणाट येथे आहे. तसेच वडिलोपार्जित तीन एकर जमीनही आहे. या संशयित आरोपीचे आई- वडिल शेती करतात. याशिवाय गाडेला एक भाऊ, पत्नी, लहान मुले असा परिवारही आहे. दत्ता गाडे काहीही काम करत नसे, पण त्याला झटपट पैसे कमविण्याचा नाद लागला आणि त्यातूनच त्यानं चोरी करायला सुरुवात केली. अशी माहिती स्थानिकांनी दिली.