Kolhapur : स्वरानुभूती’ संगीतमय दिवाळी पहाटमुळे उत्साह द्विगुनित
दैनिक तरूण भारत संवाद व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या उपक्रमाचे श्रोत्यांतुन कौतुक
कोल्हापूर : दैनिक तरूण भारत संवाद व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने लक्ष्मी पुजनाच्या पहाटे (दि.21 रोजी) आयोजित केलेल्या ‘स्वरानुभूती’ संगीतमय दिवाळी पहाट या सुरेल सांगितिक कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या मैफलिने दिवाळीचा उत्साह वाढवला असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमात गौरव महाराष्ट्राचा महाविजेता व प्रसिद्ध गायक कौस्तुभ गायकवाड, झी मराठी सारेगमप लिटल चॅम्प महाविजेती, गायिका कार्तिकी गायकवाड (पिसे), गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांनी एका पेक्षा एक सुरेल भक्ती गीते, भाव गीते, लावणी आदी गाणी सादर करत रसिकांना शेवटपर्यंत खिळवुन ठेवले. या उपक्रमाबद्दल व्यक्त झालेल्या रसिक प्रायोजकांच्या प्रतिक्रीया.
दैनिक तरूण भारत संवाद व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने दिवाळीच्या पहाटे आयोजित केलेल्या कार्यक्रमाने आंनद द्विगुनित केला आहे. अशा कार्यक्रमातून दिवाळीची पहाट अधिक सुखद झाली. याबद्दल लोकमान्य सोसायटी व तरुण भारत संवाद यांचे मन:पूर्वक आभार. एक आल्हाददायक ‘स्वरानुभूती‘चा भाग म्हणून याचा आनंद आणि अभिमान वाटतो. : निकितेश पाटील, हॉटेल रेडीयंट (हॉस्पिटॅलिटी पार्टनर)
स्वरानुभूती संगीतमय दिवाळी पहाट हा अत्यंत सुंदर आणि सांगीतिक अनुभव होता. तरूण भारत संवाद व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन खूप उत्तम झाले. या स्पॉन्सरशिपचा भाग झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला. लोकमान्य सोसायटी आणि तरुण भारत यांनी खरोखरच एक उत्कृष्ट उपक्रम साकारला आहे. : राजेश काजवे, काजवे फर्निचर
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व तरूण भारत संवाद यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत दिवाळीच्या पहाटेला सुरेल रंग दिला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन आणि वातावरण प्रभावी होते. आम्ही या उपक्रमाचा भाग होऊन आनंदी आहोत. यापुढेही असेच उपक्रम राबवुन लोकांचा आनंद द्विगुनित करावा. : अनुश्री मोतीवाला, नवग्रह केंद्र
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व तरूण भारत संवाद यांनी आयोजित केलेला स्वरानुभूती हा कार्यक्रम समाजाशी जोडणारा आणि प्रेरणादायी होता. या सह-प्रायोजकत्वाचा भाग झाल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. अशा कार्यक्रमामुळे दिवाळीचा उत्साह वृद्धीगंत झाला आहे.
विशाल शिंदे, येस बँक
‘स्वरानुभूती’ संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम अत्यंत मनमोहक झाला. संगीत, वातावरण आणि आयोजन सर्वच उत्तम होते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व तरूण भारत संवाद यांनी उत्तम व्यवस्थापन केले. या सुंदर उपक्रमात सहभागी होता आल्याने आम्हाला आनंद झाला.
विनायक गुरव, वरिष्ठ व्यवस्थापक सारस्वत बँक
संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि सांस्कृतिक मूल्य जपणारा होता. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व तरूण भारत संवाद यांनी अप्रतिम आयोजन केले, आणि त्याचा भाग होऊन आम्हाला आनंद वाटला. स्वरानुभूतीने दिवाळीची सकाळ अधिक रंगतदार केली. या कार्यक्रमातून एक उर्जा मिळाली आहे.
प्रदिप शिरोलकर, शाखाधिकारी, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक