Kolhapur : 'स्वरानुभूती' दिवाळी पहाट कार्यक्रम 21 ऑक्टोबरला
'तरुण भारत संवाद' आणि 'लोकमान्य मल्टिपर्पज' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
कोल्हापूर : तरुण भारत संवाद आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी-स्टेट) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरकरांसाठी दिवाळीच्या मंगलमय पहाटे संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 'स्वरानुभूती' या विशेष कार्यक्रमात आणि 'तरुण भारत' दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० वाजता, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
'झी गौरव महागायक' विजेती व सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड (पिसे), गायक कौस्तुभ गायकवाड आणि पंडित कल्याणजी गायकवाड हे दिग्गज कलाकार आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतील. हा कार्यक्रम कोल्हापूरच्या सर्व संगीतप्रेमींसाठी विनामुल्य खुला आहे.
या कार्यक्रमाचे प्रवेश पास लोकमान्य सोसायटीच्या शाखांमध्ये तसेच 'तरुण भारत संवाद' कार्यालयात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या मिळणारी कार्यक्रमातून लोकवर्गणी 'लोककल्प फाउंडेशन'ला दान करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.