For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेत स्वरानंद वाफोली विजेता

06:04 PM Mar 14, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेत स्वरानंद वाफोली विजेता
Advertisement

भाजपा महिला मोर्चा बांदा शहर यांचे आयोजन

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बांदा शहर आयोजित जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेत स्वरानंद महिला भजन मंडळ वाफोली संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. अभंग भजन मंडळ कुडाळ द्वितीय तर श्री बांदेश्वर महिला भजन मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बांदा कट्टा कॉर्नर येथील आनंदी मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा भजन मंडळाचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बांदा जि प सदस्य प्रमोद कामत, सरपंच प्रियांका नाईक, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, परीक्षक निलेश मेस्त्री, सम्राज्ञी आईर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, महिला तालुकाध्यक्ष रूपाली शिरसाट, श्रीमती कशाळीकर उपस्थित होते.यावेळी संतोष कानडे म्हणाले, भजन सेवेद्वारे भगवंताकडे पोचण्याचा सोपा मार्ग आहे. मंडळानी स्पर्धा म्हणून न पाहता भगवंताची सेवा म्हणून पहावे. भजन स्पर्धेत आता पुरुषांच्या बरोबरीने महिलाही दिसतात हे खूप आशादायी चित्र आहे. महिला भजन मंडळानी शासनाच्या भजन साहित्य खरेदी अनुदानाचा फायदा घ्यावा. यासाठी वेळेत प्रस्ताव सादर करावेत. भाजपकडून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. यावेळी प्रमोद कामत, निलेश मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम स्वरानंद भजन मंडळ वाफोली, द्वितीय अभंग महिला भजन मंडळ कुडाळ, तृतीय श्री देव बांदेश्वर महिला भजन मंडळ बांदा, उत्तेजनार्थ माऊली भजन मंडळ डोंगरपाल आणि ब्राम्हण देव भजन मंडळ पावशी. (वैयक्तिक बक्षिसे) उत्कृष्ट गायक भावना परब (स्वरानंद भजन मंडळ वाफोली), उत्कृष्ट हार्मोनियम - आनंद नाईक (सातेरी केळबाई भजन मंडळ दोडामार्ग), उत्कृष्ट पखवाज अथर्व नेरुरकर (अभंग भजन मंडळ कुडाळ).स्पर्धेचे परीक्षण निलेश मेस्त्री व सम्राज्ञी आईर यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जावेद खतीब, शीतल राऊळ, बाळू सावंत, दर्पण आळवे, बाबा काणेकर, विनेश गवस, नितीन सावंत, जयेश सावंत, सुधीर शिरसाट, निलेश कदम आदीसह भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले होते. प्रास्ताविक श्वेता कोरगावकर, सूत्रसंचलन बाळा आकेरकर, आभार माधवी गाड यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजप महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Advertisement
Advertisement
Tags :

.