कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘स्वराज्य केसरी’ची तयारी वेगाने! युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्याकडून खासबाग मैदानाची पाहणी

08:14 PM Jan 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
Princess Sanyogitaraj Chhatrapati
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

ऐतिहासिक खासबाग मैदानात 11 फेब्रुवारी रोजी ‘स्वराज्य केसरी’ निकाली कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत. मैदानाची तयारी वेगाने सुरू आहे. नियोजनाच्या पूर्वतयारीसाठी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी मंगळवारी खासबाग मैदानावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Advertisement

मैदान तयार करण्यापासून बैठक व्यवस्था, पाणी, वीज पुरवठा इत्यादी मुलभूत सुविधा महानगरपालिका करून देणार आहे. या बाबत भेटीत चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष कुस्ती मैदानावेळी उपस्थित कुस्ती शौकिनांना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही, अशा पद्धतीने तयारी करण्यात येत आहे. तसेच मल्लांबरोबर येणाऱ्या समर्थकांना देखील मुलभूत सुविधा मिळाव्यात, मैदानाची रंगरगोटी, तसेच पडझड झालेल्या भितींची डागडुजी, स्वच्छतागृह यांची त्वरित दुरूस्ती व स्वच्छता करण्याच्या सुचना संबधित विभागांना आवश्यक त्या सुचना करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षराज घाटगे, नारायण भोसले, विजय पाटील, इस्टेट विभागाचे सचिन जाधव, आरोग्य अधिकारी जयवंत पोवार, डबल महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशिलकर, स्वराज्यचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, फत्तेसिंह सावंत, माजी नगरसेवक विनायक फाळके, आदिल फरास, राहुल शिंदे, अशोक पोवार, हेमंत साळोखे, विकास देवाळे, प्रविण पोवार, अमित पाटील, अमित पवार, दिवाकर पाटील, विनोद कांबळे, उदय बोंद्रे, पुरूषोत्तम गुरव, अभयसिंह पाटील, संदीप चौगले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
KhasBagh MaidanPrincess Sanyogitaraj ChhatrapatiSwarajya KesariTbdnews
Next Article