'स्वरा भास्कर' ट्विटमुळे झाली पुन्हा ट्रोल
मुंबई
अभिनेत्री 'स्वरा भास्कर' सतत चर्चेत असते. कधी तिने केलेले वादग्रस्त विधान, एखादे भाषण किंवा ट्विट यामुळे ती नेहमीच नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा विषय बनते. आता तिने 'छावा' या सिनेमाबद्दल केलेल्या ट्विटमुळे ती ट्रोल होत आहे.
'स्वरा भास्कर'ने 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि प्रयागराजमधील कुंभमेळाव्यात होणारी चेंगराचेंगरी याचा एकमेकांशी संबंध जोडून ट्विटरवरून निशाणा साधला आहे.
प्रयागराज येथील 'महाकुंभ' मेळ्यात आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी उपस्थिती लावली आहे. कुंभमेळाव्यात काही ठिकाणी आग लागली तर काही ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. नेमकं याच मुद्द्यावर 'स्वरा भास्कर'ने बोट ठेवले आहे.
नेमकं काय 'ट्विट' केलंय 'स्वरा भास्कर' नं ?
"चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनमुळे भयानक मृत्यू होत आहेत. ते मृतदेह जेसीबी बुलडोझर च्या सहाय्याने काढले जासत असल्याचाही आरोप होत आहे. यापेक्षा, जो समाज चित्रपटात दाखवलेल्या ५०० वर्षांपूर्वीच्या हिंदूचा छळ पाहून भावुक होतो, तो समाज बुद्धीने आणि आत्माने मृत पावलेला समाज आहे". असा ट्विटी अभिनेत्री 'स्वरा भास्कर'ने केले आहे.