For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Zilla Parishad | ‘स्वर तरंग’मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचा जल्लोष; प्रेक्षकांकडून वन्स मोअरची दाद

12:12 PM Mar 09, 2026 IST | NEETA POTDAR
satara zilla parishad   ‘स्वर तरंग’मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचा जल्लोष  प्रेक्षकांकडून वन्स मोअरची दाद
Advertisement

                          सातारा जिल्हा परिषदेचा ‘स्वर तरंग’ कार्यक्रम रंगला

Advertisement

सातारा -आशिकी, दिवाना, डॉन या हिंदी चित्रपटाबरोबरच मिक्सिंग गाणी, मराठी लावण्या, रॅप सॉंग, प्रेन गीत, सोलो डाँस अस सर्व काही पहायला, ऐकायला मिळून वन्स मोअरचा नारा, शिट्याची दाद अन टाळ्यांचा कडकडाटाचा प्रतिसाद पाहून जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांचा मनाचा मोगॅम्बो खुश हुआ असेच म्हणावे लागेल. निमित्त होतं सातारा जिल्हा परिषद सांस्कृतिक कार्यक्रम स्वर तरंगचे.

सातारा जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 11 पंचायत समितीतले कर्मचारी 365 दिवस जनतेची कामे करत असतात मात्र त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शक सूचने नुसार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रज्ञा माने, शिक्षणाअधिकारी योजना शबनम मुजावर यांनी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. सुरुवात कनिष्ठ प्रशासन अधिकारी मारुती जाधव गणेश वंदनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमाला रंगत येऊ लागली.ज्ञानेश पवार यांनी हिरो चित्रपटातील कैसी जुडाई हे दरदर्भरी गीत बासरीतून सादर केले.त्यांच्या सादरीकरणाला टाळ्याचा कडकडाटात प्रतिसाद दिला.

Advertisement

वाई येथील आरोग्य सेविका प्रतिभा फिरमे यांनी रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी हात नघा लागू माझ्या साडीला ही पिंजरा चित्रपटातल्या लावणीवर बहारदार नृत्य सादर केले.स्वर मैफिल सागर जाधव आणि शुभांगी या माण तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी हिंदी गीतांची मेजवानी सादर केली. खंडाळा पंचायत समितीच्या नृरूटे माळी आणि कर्मचाऱ्यांनी मुझको हुई ना खबर,डिंग डाँग डिंग एक दोन तीन, सोना कितना सोना अशा रिमिक्स गाण्यावर परफार्म केला. दीपक यांनी सोचेने तुम्हे यावर अप्रतिम सादरीकरण केले. बांधकाम विभाग महेंद्र जांभळे आणि सहकाऱ्यानी यहा भी होगा, मोगनबो खुश हुआ अस मिक्सिंग सादरीकरण केले. फलटणच्या शहनाज शेख या शिक्षिकेने हे मेरा प्यार का दिल दिवाना हे डॉन मधील गाणं सादर केलं.

राजस्थानी नृत्यसिद्धी चव्हाण यांनी सादर करून ठेका धरायला लावत वन्स मोअर करायला लावले. पाटणचे शिक्षक दिनकर शिर्के यांनी एक होत तळ हे हटके रॅप सॉंग सादर केलं. चोरीचा मामला हे मराठी गाणं राजेंद्र शिंदे, दीपाली महामुनी यांनी सादर करून अशोक सराफ यांच्या काळातली आठवण करून दिली उपस्थिताना. जावळीच्या उपशिक्षिका दीपाली चव्हाण यांनी खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन या गीतावर सादरीकरण केले. कराडच्या शिक्षण विस्तार अधिकारी जमीला मुलाणी यांनी नयना लागे रे गीत सादर केले. वरिष्ठ सहायक महेश भोंडवे आशिकी मधील दिल का आलम गीत सादर केले.शुभांगी बोबडे आणि शिल्पा निंबाळकर यांनी स्त्री शक्तीचा जागर नृत्यातुन सादर करून अनोख्या पध्दतीने जागतिक महिला दिनी महिला कमी नाहीत हे दाखवून दिले. तापोळाचे आरोग्य सेवक राजेंद्र जाधव यांनी परडा है ही कवाली अमर अकबर अंथॉनी मधली सादर केली. संगीता ठोके यांनी सातारची गुलछडी ही लावणी सादर करून लावणीच्या ठेका ह्रदयाचा ठोका चुकवला. वरिष्ठ सहायक विजय ढाणे मनाच्या धुंदीत या गाण्याचे सादरीकरण करत वेगळ्या उंचीवर कार्यक्रम नेला. अशी सुरांची, तालाची गट्टी जमली होती.

सूत्रसंचालनाने दिले प्रोत्साहन
रांगड्या आवाजाचे सूत्रसंचालक सुनिल मोरे पाटील आणि मृदू आवाजाच्या जयमाला चव्हाण यांनी प्रत्येक सादरीकरणात कलाकाराना प्रोत्साहन देत प्रेक्षकांना ही त्यांनी कार्यक्रमाची महती पटवून देत वेगळ्या उंचीवर कार्यक्रम नेण्यासाठी प्रयत्न केला.

Advertisement
Tags :

.