कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेची ऑलिंपिकमध्ये कास्यपदकाला गवसणी! कांबळवाडीत एकच जल्लोष
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये आता भारताचा झेंडा उंचावला असून पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकावर मोहोर उमटवली आहे. त्याच्या या यशाने कोल्हापूर सह राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये वैयक्तीक क्रिडा प्रकारामध्ये खाशाबा जाधवांच्या पदकानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राला पदक मिळाल्याने त्याला विषेश महत्व आले आहे.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=BN3310aABDo[/embedyt]
पॅरिसमध्ये सुरु असलेल्या 2024च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या पुरषांच्या नेमबाजी स्पर्धेवर राज्यासह संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहीलं होतं. काल झालेल्या फेरीमध्ये स्वप्निल कुसाळे यांने अंतिम फेरिमध्ये धडक देऊन आपले पदक निश्चित केलं होतं. त्यामुळे स्वप्निलकडून पदकाची आपेक्षा वाढल्या होत्या.
आज दुपारी सुरु झालेल्या या प्रकारामध्ये अंतिम फेरीतील आठ स्पर्धक नेमबाजांमध्ये एकूण ४५१. ४ गुण स्वप्निलने नोंदवले. एकावेळाला सहाव्या स्थानावर असलेल्या स्वप्निलने जबरदस्त कमबॅक करत तिसरे स्थान पटकावले. आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताला तिसरे कांस्यपदक जिंकले. स्वप्निल नीलिंग आणि प्रोन राउंडनंतर पिछाडीवर राहीला होता पण त्यानंतर त्याने आपली सर्वोच्च कामगिरी दाखवत पदकाला गवसणी घातली.
देशासाठी पदक आल्याने सार्थ अभिमान
देशासाठी पदक मिळवल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वप्निलच्या वडिलांनीस "आम्ही त्याला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू दिले. त्याचे कोणत्याही प्रकारे लक्ष विचलित होऊ नये म्हणून काल त्याला मी फोनही केला नाही. गेली 10 ते 12 वर्षे तो घरापासून दूर असून तो आपल्या खेळावर चांगले लक्ष केंद्रित करत होता. मात्र देशासाठी माझ्या मुलाने पदक मिळवल्याचा सार्थ अभिमान आहे,” अशा भावना व्यक्त केल्य़ा.
धोनीचा चाहता
क्रिकेटपटू एमएस धोनीचा खूप मोठा चाहता असेलेल्या स्वप्निलने अनेक वेळा महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक पाहिला असून त्यातूनच त्यानं प्रेरणा घेतल्याचं त्यानं म्हटलं होतं.