For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'गोकुळ' कडून स्वप्निल कुसाळेला एक लाखाचे बक्षीस! कुसाळे कुटुंबियांना संचालकांनी भेटून केले अभिनंदन

08:33 PM Aug 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
 गोकुळ  कडून स्वप्निल कुसाळेला एक लाखाचे बक्षीस  कुसाळे कुटुंबियांना संचालकांनी भेटून केले अभिनंदन
Swapnil Kusale Gokul
Advertisement

कोल्हापूर : प्रतिनिधी

ऑलिम्पिक ब्रॉन्ज पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याला गोकुळ दूध संघातर्फे एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीरक केले. दिले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे अभिनंदन केले.

Advertisement

यावेळी अरुण डोंगळे म्हणाले, स्वप्निलचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गोकुळने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून स्वप्निलच्या या यशाबद्दल त्याला गोकुळमार्फत 1 लाख रुपये बक्षीस म्हणून जाहीर केले व तो कोल्हापूर मध्ये आलेनंतर त्याचा व कुटुंबियांचा गोकुळमार्फत यथोचीत सत्कार करून धनादेश प्रदान कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले व त्याचे निमंत्रण त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले. यावेळी स्वप्निल चे वडील सुरेश कुसाळे व आई अनिता कुसाळे यांनी स्वप्निलच्या या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, आर.के.मोरे, अभिजित तायशेटे, किसन चौगले, बी.आर.पाटील,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,संग्राम मगदूम आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.