For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वप्नेश शेर्लेकर यांना फोनवरून दिली धमकी

12:59 PM Sep 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वप्नेश शेर्लेकर यांना फोनवरून दिली धमकी
Advertisement

महानंद अस्नोडकर विरोधात तक्रार दाखल 

Advertisement

पणजी : रामा काणकोणकर यांच्यावर काही दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता समाजकार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर (रा. मुळगाव-डिचोली) यांना फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शेर्लेकर यांनी पर्वरी पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली असता त्यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर (सुकूर-पर्वरी) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी काल शुक्रवारी पोलिस स्थानकात बोलावून दोघांनीही एकमेकांच्या वाटेला न जाण्याची समज दिली आहे. यावेळी शेर्लेकर म्हणाले की, आपल्याला हे प्रकरण वाढवायचे नाही मात्र अस्नोडकर यांनी आपली माफी मागावी आणि इथेच हे प्रकरण बंद करावे, असे शेर्लेकर यांनी सांगितले. यावर प्रत्युत्तर देताना  अस्नोडकर यांनी उलट तूच आपली माफी  माग, असे त्यांना ऐकविल्याने हे प्रकरणे वाढण्याचा संशय आहे.

दोन दिवसांपूर्वी शेर्लेकर यांनी आपल्या सोशलमीडिया ब्लॉगमध्ये व्याघ्र अभयारण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर भाष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त केलेल्या नवदुर्गेच्या पूजेचा फोटो भाजपच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. याचा संदर्भ घेऊन शेर्लेकर यांनी भाजप नेत्यांवर टीका केली होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महानंद अस्नोडकर यांनी गुऊवारी रात्री शेर्लेकर यांना फोन केला आणि त्यांना ‘देशद्रोही’ म्हणत धमकी दिली. त्यानंतर शेर्लेकर यांनी त्याच रात्री सहकाऱ्यांसह पर्वरी पोलिस ठाण्यात अस्नोडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Advertisement

कार्यकर्त्यांवर हल्ला हा गोव्यावर हल्ला : विजय सरदेसाई

गोव्यातील पर्यावरणविषयक लढाई धैर्याने लढणाऱ्या आणखी एका प्रख्यात कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकी दिल्याने धोका निर्माण झाला आहे.  भाजपचे मौन गुंडांना कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यास प्रोत्साहित करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा गोवा फॉरवर्डचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केला आहे. कार्यकर्त्यांवरील हल्ला हा गोव्यावरील हल्ला आहे आणि आम्ही गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.