कळंब्यात उभारतोय स्वामी विवेकानंदांचा रामकृष्ण मठ : कळंब्यातील 12 एकर जागेत निर्मिती
रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक केंद्राचा पुढाकार, मठात मानवसेवेसह संस्कार शिबिराचे मार्गदर्शन
संग्राम काटकर कोल्हापूर
‘मानवसेवा हीच ईश्वर सेवा’ हा विचार ऊजवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. कालांतराने विस्तारलेल्या मठाच्या 200 शाखा देशात उभारल्या. कोल्हापुरातील राजारामपुरी अकराव्या गल्लीत 2010 पासून कार्यरत रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक केंद्राने कळंबा येथील 12 एकर जागेत मठाची शाखा उभारणी सुरू केले आहे. यामध्ये बालक, युवकांमध्ये मानवसेवा, राष्ट्रसेवा, संस्कार, नितीमुल्ये बिंबवून त्यांना वैचारिकदृष्ट्या बलवान करणारी केंद्रे सुऊ केली जाणार आहेत. ऊग्णसेवेचे उपक्रमही राबवले जाणार आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रसुद्धा येथे असणार आहे.
प्रत्येक जीव शीव आहे. प्रत्येकात ईश्वरत्व आहे. त्याची सेवा झालीच पाहिजे, अशी रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना शिकवण दिली. यातून प्रेरित झालेल्या विवेकानंदांनी माणसातील ईश्वरत्व जागृत करण्याचे ध्येय समोर ठेवले. ते समाजात बिंबण्याबरोबरच उठा, धीट बना, बलवान व्हा, हा संदेशही देण्यासाठी विवेकानंदांनी 1897 मध्ये हावडा (पश्चिम बंगाल) येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली. पुढील काही वर्षांनी विवेकानंद व त्यांच्या अनुयायींकडून देशभरासह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सकवार (पालघर), औरंगाबाद, नागपूर येथे मठ सुऊ केले. परदेशातही 67 ठिकाणी स्थापन झालेल्या मठांशी भारतीयांसह परदेशी नागरिक जोडले गेले. बहुसंख्य मठांमध्ये सकाळी रामकृष्ण परमहंसांची आरती केल्यानंतर ऊग्णसेवा, शैक्षणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय, मानवसेवा, ऊरल डेव्हलपमेंट आदींसह विविध विषयांवर कृतीशील मार्गदर्शन देणारी शिबिरे घेतली जातात.
रामकृष्ण मठाची शाखा कोल्हापूरच्या दक्षिणेला असलेल्या कळंब्यातील 12 एकर जागेतही उभारत आहे. संपूर्ण मठाची निर्मिती झाल्यानंतर बालक, युवकांमध्ये राष्ट्रसेवा, संस्कार, नितीमुल्यांची शिकवण देणाऱ्या केंद्रासह लोकांना संगणक साक्षर करणारे संगणक प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्रही सुऊ केले जाणार आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या उपदेशावर आधारीत आध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मठाच्या मध्यभागी स्वामी श्रीकृष्णदेव मंदिराची उभारणी केली जाणार आहे. मठात आरोग्य तपासणी केंद्रासह विवेकानंदांच्या जीवनावरील शेकडो पुस्तकांचे ग्रंथालय असणार आहे. लवकरच रामकृष्ण मठाच्या उभारणीसह विविध प्रकारची केंद्रे सर्वसोयीनियुक्त सुऊ करण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलित केला जात आहे. यासाठी इच्छूकांनी राजारामपुरीतील रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राने केले आहे.
रामकृष्ण मठात सर्व जाती-धर्मियांना प्रवेश...
आध्यात्मिक उन्नती करण्याबरोबर बल हेच जीवन अशी शिकवण देणारा रामकृष्ण मठ जगात औत्सुक्याचा विषय बनला आहे. कोल्हापुरातील मठासाठी दानशुराने 12 एकर जागा दान दिली आहे. या जागेत होणाऱ्या मठात जीवनाचा योग्य मार्ग दाखवणाऱ्या केंद्रांसह ‘मानवसेवेवर आधारीत शिबिरांमध्ये सर्व जाती-धर्मीयांना प्रवेश आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभावाच्या भावनेला अधिक चालना मिळेल.
स्वामी बुद्धानंद (कार्यवाह : रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक केंद्र)