आरोंदा येथे २८ जानेवारीला स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा
अक्कलकोट वरून होणार श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे आगमन
न्हावेली / वार्ताहर
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट येथून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे मंगळवार दिनांक २८जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता आरोंदा गावी आगमन होणार आहे. कस्टम ऑफिस , खासकीलवाडा येथे पादुकांचे आगमन व स्वागत करण्यात येणार आहे .तिथूनच पालखी पादुकांचे सवाद्य सहित भव्य दिव्य अशी मिरवणूक मार्गक्रमण करत श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिर देऊळवाडा मार्गे श्री देव कुळकार देवस्थान मंदिर (इनामतबाग ) पीरवाडी आरोंदा येथे येऊन स्थानापन्न होणार आहे. यानिमित्ताने रात्री आठ वाजता आरती व पुष्पांजली ,रात्रौ साडेआठ वाजता महाप्रसाद भंडारा , रात्रौ नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम (आरोंदा संयुक्त भजन मंडळ ) होणार आहे.तसेच , बुधवार दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी पाच वाजता श्री स्वामी समर्थ पादुकांरावर दुग्धाभिषेक करण्यात येईल.अन्नदान महाप्रसाद( भंडाऱ्या) करता इच्छा आणि निवडलेले तांदूळ,तूरडाळ, रवा ,साखर,तूप ,बटाटे,तेल यापैकी कोणत्याही वस्तू ( देणगी) रविवार दिनांक २६ जानेवारी पर्यंत बाबा गावडे व राजू तानावडे यांच्या जवळ आणून द्यावीत. तसेच या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भक्त व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आरोंदा यांनी केले आहे.