For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वदेशी ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण

12:07 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वदेशी ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण
Advertisement

संरक्षणमंत्र्यांची उपस्थिती : गोवा शिपयार्डमध्ये निर्मिती : भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने झेप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय तटरक्षक दलासाठी सोमवार हा खूप खास दिवस असणार आहे. आज, 5 जानेवारी 2026 रोजी स्वदेशी बनावटीच्या ‘समुद्र प्रताप’ या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यातील गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे या जहाजाचे कमिशन करणार आहेत. गोवा शिपयार्डने बांधलेले हे जहाज 60 टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याने बनवले आहे. दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी पहिले ‘समुद्र प्रताप’ सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत कार्यन्वित करण्यात येणार असल्याचे गोवा शिपयार्डने म्हटले आहे.

Advertisement

‘समुद्र प्रताप’ हे 4,200 टन वजनाचे स्वदेशी जहाज आहे. ते 114.5 मीटर लांब असून त्याचा वेग 22 नॉट्सपेक्षा जास्त आहे. 6,000 नॉटिकल मैलापर्यंत ते चाल करू शकते. या जहाजामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद, अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये वाढ होईल असा दावा केला जात आहे.

‘समुद्र प्रताप’ची रचना तटरक्षक दलाच्या विशिष्ट ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करण्यासाठी देशातच करण्यात आली आहे. हे जहाज 114.5 मीटर लांब आणि 16.5 मीटर रुंद आहे. त्यात 14 अधिकारी आणि 115 खलाशी असतील. महत्त्वाचे म्हणजे हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि बांधलेले हायब्रिड, समुद्रात जाणारे प्रदूषण नियंत्रण जहाज ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.