कोल्हापुरात कृषिमंत्र्यांच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन
पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट
पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट..
कोल्हापूर
कोल्हापुरातून राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या विरोधात स्वाभिमनी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. कृषिमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कारवाई करत असताना पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आणि भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोल्हापूर दौऱ्यावर येण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. शेतकऱ्यांची माफी मागावी मगच कोल्हापुरात यावे, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलनाचा इशारा ही दिला होता.
यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून सकाळपासूनच शासकीय विश्रामगृह बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट ही झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.