For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्विटोलिना-मोनफिल्स दुहेरीच्या उपांत्य फेरीत

06:45 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्विटोलिना मोनफिल्स दुहेरीच्या उपांत्य फेरीत
Advertisement

बेन्सिक-कोबोलीकडून सेरेना-अल्कारेझ पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सुरू झालेल्या मिश्र दुहेरीच्या प्रकारात इलिना स्विटोलिना आणि गेल मोनफिल्स यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना सिनीयाकोव्हा आणि पॅटेन यांचा पराभव केला. तसेच या प्रकारामध्ये अमेरिकेची सेरेना विलियम्स व तिचा साथीदार स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Advertisement

मिश्र दुहेरीच्या सामन्यात स्विटोलिना आणि मोनफिल्स यांनी कॅटरिना सिनीयाकोव्हा व हेन्री पॅटेन यांचा 5-4, 6-4, 4-5 (3-5), 10-8 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि तिचा स्पेनचा साथीदार कार्लोस अल्कारेझ यांना दुसऱ्या फेरीतील सामन्यात बेलिंडा बेनसिक आणि कोबोली यांनी 5-4 (6-4), 4-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

या स्पर्धेवेळी सध्या अमेरिकेत उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढल्याने टेनिसपटूंची दमछाक होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात 44 वर्षीय सेरेना आणि स्पेनचा अल्कारेझ यांनी इरीन रूटलिफ आणि ग्लासपूल यांचा 5-3, 4-1 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली होती. रशियाच्या अँड्रीव्हा आणि रुब्लेव्ह या जोडीने सारा इराणी व व्हेव्हासोरी यांचे आव्हान 1-4, 4-1 (11-9) असे संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :

.