For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्विटोलिना, सिर्स्टिया, कोस्ट्युक उपांत्यपूर्व फेरीत दाखल

06:55 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्विटोलिना  सिर्स्टिया  कोस्ट्युक उपांत्यपूर्व फेरीत दाखल
Advertisement

स्वायटेक, कोको गॉफ, बेन्सिक यांचे आव्हान समाप्त, बेरेटिनी, ओसाका, आर्यना साबालेंका चौथ्या फेरीत दाखल

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात सातवी मानांकित युक्रेनची इलिना स्विटोलिना तसेच रोमानियाची सोराना सिर्स्टिया यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे फ्रान्सच्या नाओमी ओसाकाने तसेच रशियाच्या डायना स्नेडर यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या विभागात इटलीच्या बेरेटिनीने चौथ्या फेरीत स्थान मिळविले. मात्र पोलंडच्या इगा स्वायटेकला युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युककडून तर विद्यमान विजेत्या कोकोल गॉफला पोटापोव्हाकडून पराभवाचा धक्का बसला. स्विसच्या बेन्सिकचे आव्हान स्विटोलिनाने संपुष्टात आणले.

Advertisement

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात युक्रेनच्या इलिना स्विटोलिनाने स्विसच्या बेलिंडा बेन्सिकचा 4-6, 6-4, 6-0 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. आता स्विटोलिना आणि मार्टा कोस्ट्युक या दोन युक्रेनच्या खेळाडूंमध्ये उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल. चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात युक्रेनच्या 15 व्या मानांकित मार्टा कोस्ट्युकने पोलंडच्या इगा स्वायटेकचे आव्हान 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या 18 वर्षीय इव्हा जोव्हिकचा 7-6 (7-5), 6-7 (3-7), 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 3 तास चालला होता. ओसाकाचा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा 100 वा सामना होता. बेल्जियमच्या आर्यना साबालेंकाने डॅरिया कॅसेटकिनाचा 6-0, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत चौथी फेरी गाठली आहे. ओसाका आणि साबालेंका यांच्यात चौथ्या फेरीचा सामना होईल.

रशियाच्या 28 व्या मानांकित अॅनास्तेशिया पोटापोव्हानेअमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफला 4-6, 7-6 (7-1), 6-4 अशह पराभवाचा धक्का देत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. रशियाच्या डायना स्नायडरने युक्रेनच्या ओलिनीकोव्हाचा 7-5, 6-1 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत स्थान मिळविले आहे.

पुरुषांच्या विभागातील तिसऱ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या ज्येष्ठ मॅटो बेरेटेनिने अर्जेंटिनाच्या कोमेसेनाचा 7-6 (7-3), 5-7, 6-7 (4-7), 6-4, 7-6 (15-13) अशा 5 सेट्समध्ये पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. बेरेटेनिचा चौथ्या फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या जुआन सेरुनडोलोशी होणार आहे. सेरुनडोलोने या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात इटलीच्या टॉप सिडेड जेनिक सिनरला पराभवाचा धक्का दिला होता.

Advertisement
Tags :

.