सुझुकीने न्यूझीलंडमध्ये फ्रँक्सची विक्री थांबवली
नवी दिल्ली :
जून 2025 पासून न्यूझीलंडमध्ये फ्रँक्सची विक्री सुरू झाली होती. परंतु मारुती सुझुकीने न्यूझीलंडमध्ये सुझुकी फ्रँक्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. फ्रँकच्या क्रॅश टेस्टमध्ये 1 स्टार रेटिंग मिळाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. खरं तर ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एएनसीएपी) क्रॅश टेस्टमध्ये सुझुकी फ्रँक्सला फक्त 1 स्टार रेटिंग मिळाले. चाचणीत, मागील प्रवासी सीटबेल्ट निकामी झाला, ज्यामुळे डमी अनियंत्रित झाला आणि पुढच्या सीटवर आदळला. एएनसीएपीने याला एक दुर्मीळ पण गंभीर सुरक्षा समस्या म्हटले आहे. न्यूझीलंडमध्ये विकल्या गेलेल्या 1,115 फ्रँक्सच्या मालकांना मागच्या सीटवर प्रवाशांना न बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एएनसीएपी चाचणी
एएनसीएपीने केलेल्या चाचणीत मागील सीटबेल्टमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे मागील डमी पूर्णपणे अनियंत्रित झाली. एएनसीएपीच्या सीईओ कार्ला हूरवेग म्हणाल्या की सीटबेल्ट बिघाड दुर्मीळ आणि गंभीर आहेत.
बिघाडाची चौकशी
सुझुकीने सांगितले की सुरक्षितता सर्वोपरी आहे, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. फ्रँक्स जूनपासून न्यूझीलंडमध्ये आणि ऑगस्ट 2025 पासून ऑस्ट्रेलियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली. भारतात विकल्या जाणाऱ्या फ्रँक्सची ग्लोबल एनसीएपी किंवा इंडिया एनसीएपीद्वारे चाचणी घेण्यात आलेली नाही.