For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुझलॉनचे समभाग 5 टक्क्यांनी मजबूत

06:45 AM Jan 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुझलॉनचे समभाग  5 टक्क्यांनी मजबूत
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार सपाट पातळीवर उघडले, परंतु दुपारच्या व्यापारात निफ्टी आणि सेन्सेक्सने चांगला नफा मिळवला. म्हणजेच दोन्ही निर्देशांक 0.50 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत. दरम्यान, पुण्यातील ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉनचे शेअर्स नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जवळपास 5 टक्क्यांनी वधारले आहेत. मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने महत्त्वपूर्ण अपडेट्स जाहीर केल्यानंतर ही उडी आली. सुझलॉन एनर्जीचे शेअर्स बुधवारी 62.64 रुपयांवर उघडले, तर ते 65.33 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. त्याचवेळी सुझलॉनचा शेअर मंगळवारी 62.22 रुपयांवर बंद झाला. सुझलॉनसह त्याची उत्पादने पवन ऊर्जा, ऊर्जा पारेषण, तेल आणि वायू, एरोस्पेस आणि मशीन टूल्स उद्योगांमध्ये वापरली जातात.

प्राप्तिकराद्वारे 260 कोटींचा

Advertisement

दंड माफ

कंपनीसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर प्राप्तिकर विभागाने 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षांशी संबंधित 260.35 कोटी रुपयांचा दंड माफ केला. ही रक्कम सुझलॉनच्या 200 कोटी रुपयांच्या (सप्टेंबर 2024 तिमाही) तिमाही नफ्याच्या जवळपास आहे.

Advertisement
Tags :

.