सुझलॉन एनर्जीला मिळाले पवन ऊर्जा निर्मितीचे कंत्राट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीला 1166 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मितीचे कंत्राट नुकतेच मिळाले आहे. सदरचे कंत्राट हे एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्याकडून मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या बातमीनंतर कंपनीचा समभाग जवळपास 3.4 टक्के वाढून 77.28 रुपयांवर पोहोचला होता. भारतात कंपनीला मिळालेले हे सर्वात मोठे कंत्राट असल्याचे बोलले जात आहे. सदरची कंपनी या अंतर्गत 3.15 मेगावॅट क्षमतेचे एस 144 चे जवळपास 370 पवन जनरेटर बसवणार आहे. या योगे सप्टेंबर 2024 पर्यंत कंपनीने एकूण 5 गिगावॅट उत्पादनाचे कंत्राट मिळवण्यात यश मिळवले आहे.
समभागाचा दमदार परतावा
सदरच्या सकारात्मक बातमीनंतर सुझलॉनचा समभाग शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 3.4 टक्के वाढून 77.28 रुपयांवर पोहचला होता. गेल्या बारा महिन्यांमध्ये सुझलॉन एनर्जीचा समभाग 218 टक्के आणि वर्षाच्या आधारावर पाहता शंभर टक्के इतका वाढला आहे.