For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुझलॉन एनर्जीला मिळाले पवन ऊर्जा निर्मितीचे कंत्राट

06:19 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुझलॉन एनर्जीला मिळाले पवन ऊर्जा निर्मितीचे कंत्राट
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

ऊर्जा क्षेत्रातील मोठी कंपनी सुझलॉन एनर्जी यांना अलीकडेच पवन ऊर्जा संबंधित कंत्राट प्राप्त झाले आहे. यासंबंधीची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलाद क्षेत्रातील कंपनी आर्सेलर मित्तल यांच्याकडून पहिल्यांदाच 248.5 मेगावॅट इतक्या पवन ऊर्जा निर्मितीचे कंत्राट मिळाले आहे. या बातमीनंतर सुझलॉन एनर्जीचा समभाग शेअरबाजारात तेजीने दौडताना दिसला. बुधवारी शेअर बाजारात कंपनीचा समभाग 3 टक्केपेक्षा अधिक वाढला होता.  याचदरम्यान कंपनीचे बाजार मूल्य 64.82 हजार कोटी रुपये इतके झाले होते.

 कोठे होणार प्रकल्प

Advertisement

मिळालेल्या कंत्राटाअंतर्गत प्रकल्प कंपनी गुजरातमधील बचाव या ठिकाणी स्थापन करणार आहे. या प्रकल्पांतर्गत कंपनी एकूण 79 विंड टर्बाइन (फिरणारी पाती) बसवणार आहे. प्रत्येक टर्बाइनची क्षमता 3.15 मेगावॅट इतकी सांगितली जात आहे. सदरच्या प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या ऊर्जेचा वापर आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील ही कंपनी आपल्या कारखान्यांकरता करणार असल्याचे समजते.

प्रदूषण निवारणात हातभार

पोलाद उत्पादनासाठी कमीत कमी कोळशाचा व कार्बनचा वापर व्हावा या उद्देशाने असे करण्यात आले असल्याचे समजते. स्वच्छ आणि हरित ऊर्जा यांना प्राधान्य देत प्रदूषण कमीत कमी करण्याकडे कंपनीचा कल असणार आहे.  सुझलॉनला या वर्षामध्ये ग्रीन स्टीलसाठी मिळालेली चौथी मोठी ऑर्डर असल्याचे सांगितले जात आहे. सुझलॉनकडे भारतामध्ये आतापर्यंत 1156 मेगावॅट पवन ऊर्जेचे कंत्राट मिळालेले आहे.

Advertisement
Tags :

.